कुंभमेळ्यादरम्यान गुप्तदानाची प्रथा आहे. दान प्रकट रूपात न करता गुप्त केले जाते त्याला गुप्तदान म्हणतात. प्रकट रूपात केलेल्या दानापेक्षा या दानाचे फळ 10 पटीने जास्त मिळते अशी श्रद्धा आहे. गुप्तदानासाठी कुठल्याही विधीची आवश्यकता नाही. आपल्या क्षमतेनुसार गरीबही हे दान करू शकतो. या दानाचा साक्षीदार फक्त परमेश्वर असतो. नवरा-बायकोसुद्धा या दानाबद्दल एकमेकांना सांगत नाहीत.
या दानात घर सोडून बाकी कुठलीही वस्तू दान करू शकता. उदा - कापड, भांडे, अन्न, रत्न, दाग-दागिने इत्यादी. हे दान भाविक इच्छेनुसार करतात किंवा दान घेणार्या व्यक्तीच्या इच्छांनुसार दान करावे. या दानात श्रद्धाळू आपल्यासाठी दोन वस्त्र सोडून बाकी सर्व काही दान करू शकतात.
हे दान करण्याअगोदर गणपतीची पूजा करावी. नंतर वेणीमाधव देवाची पूजा-अर्चना करावी. 'माधव, आनंद, विश्वेश, देवतांचे राजा तुम्हाला नमस्कार असो. कृष्ण, विष्णू, सच्चिदानंद स्वरूप, क्षीर समुद्रात निजणारे, आनंद वासुदेव तुम्हालासुद्धा आमचा नमस्कार असो. प्रभू, मी जे अनेक वस्तू एकत्रित केल्या आहेत, ते मी आपल्या इच्छेनुसार ब्राह्मणाला दान करीत आहे' अशी प्रार्थना यावेळी करावी.