कोण असतात अघोरी? कसे करतात साधना, जाणून घ्या त्यांचे रहस्य

मंगळवार, 8 जानेवारी 2019 (13:22 IST)
प्रयाग कुंममेळा जवळ येताच साधू-संतांनी डेरा लावणे सुरू केले आहे. या विशाल महा-आयोजनात सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असेल तर तो आहे अघोरी. ते जे कापालिक क्रिया करतात. ते जे तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात.  
 
घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे अ+घोर अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही, जी सोपी असेल, ज्यात कुठलाही भेदभाव नसेल.
 
अघोर बनण्याची पहिली अट आपल्या मनातून घृणेला बाहेर काढणे. अघोर क्रिया व्यक्तीला सहज बनवते. वास्तवात अघोरी त्याला म्हणतात जे श्मशानासारख्या भितीदायक आणि विचित्र जागेवर देखील सहजपणे राहू शकतात जसे लोक आपल्या घरात राहतात.
 
असे मानले जाते की अघोरी मनुष्याच्या मासांचे देखील सेवन करतात. असे करण्यामागे हाच तर्क असतो की व्यक्तीच्या मनातून घृणा निघून जायला पाहिजे. ज्याला समाज घृणा करतो अघोरी ते अंगी लावतात. लोक श्मशान, लाश, मुर्देच्या मांस व कफ़नपासून घृणा करतात पण अघोर यांना अपनवतात.
काय आहे अघोरपंथ
साधनाची एक रहस्यमयी शाखा आहे अघोरपंथ. त्यांचे आपले विधान असतात, आपली विधी असते, जीवन जगण्याचा वेगळा अंदाज असतो. अघोरपंथी साधक अघोरी म्हणून ओळखले जातात. यांना खाण्या पिण्याचे कुठलेही पथ्य नसतो. अघोरी लोक गायीचे मास सोडून बाकी सर्व गोष्टींचे भक्षण करतात. अघोरपंथात श्मशानात साधना करण्याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून अघोरी श्मशानात वास करणे पसंत करतात. श्मशानात साधना केल्याने त्याचे लगेचच रिझल्ट मिळतात.
 
अघोर पंथाची उत्पत्ती आणि इतिहास
अघोर पंथाचे प्रणेता महादेव आहे मानले जाते. म्हटले जाते की महादेवाने स्वयं अघोर पंथाचे निर्माण केले होते. अवधूत देव दत्तात्रेयाला देखील अघोरशास्त्राचे गुरू म्हटले जाते. दत्तात्रेयाला महादेवाचा अवतार मानला जातो.
 
काय करतात अघोरी
अघोर संप्रदायाचे साधक समदृष्टिसाठी पुरुष मुंडक्यांची माळा घालतात. चितेच्या भस्माचे शरीरावर लेप आणि चिताग्निवर स्वयंपाक तयार करणे इत्यादी सामान्य कार्य असतात. अघोर जागेचे भेद करत नाही अर्थात महाल किंवा श्मशान घाट यांच्यासाठी एक सारखे असतात.
 
अघोरींचा स्वभाव  
अघोरीबद्दल अशी मान्यता आहे की ते फारच कडक स्वभावाचे असतात पण आतून त्यांच्यात जन कल्याणाची भावना लपलेली असते. जर कुणावर मेहरबान झाले तर आपल्या सिद्धीचे शुभ फल देण्यास चुकत नाही आणि आपल्या तांत्रिक क्रियांचे गुपित त्यांच्यासमोर उघडतात.  इथपर्यंत की जर त्यांना कोणी पसंत पडले तर त्याला आपली तंत्र क्रिया शिकवण्यासाठी देखील राजी असतात पण यांचा राग प्रचंड असतो.
अघोरी साधना कुठे होते
अघोरी श्‍मशान घाटात तीन प्रकारे साधना करतात - श्‍मशान साधना, शिव साधना, शव साधना. या साधना जास्त करून तारापीठाचे श्‍मशान, कामाख्या पिठाचे श्‍मशान, त्र्यम्‍बकेश्वर आणि उज्जैनचे चक्रतीर्थच्या श्‍मशानात होते. अघोर पंथांचे 10 तांत्रिक पीठ मानले गेले आहे.
 
अघोरी साधना कशी केली जाते 
शिव साधनेत शवावर पाय ठेवून साधना केली जाते. या साधनेचा मूल शिवाच्या छातीवर पार्वती द्वारे ठेवण्यात आलेला पाय. अशा साधनेत प्रेताला प्रसादाच्या रूपात मांस आणि मदिरा चढवण्यात येत. शव आणि शिव साधनाशिवाय तिसरी साधना होते श्‍मशान साधना, ज्यात सामान्य परिवारजनांना सामील करू शकता. या साधनेत प्रेताच्या जागेवर शवपीठाची पूजा केली जाते. त्याच्यावर गंगा जल चढवले जाते. येथे प्रसाद म्हणून मांस-मंदिरेच्या जागेवर मावा चढवण्यात येतो.  

अघोरपंथाची तीन शाखा 
अघोरपंथाची तीन शाखा प्रसिद्ध आहे - औघड़, सरभंगी, घुरे. यातून पहिल्या शाखेत कल्लूसिंह व कालूराम झाले, जे किनाराम बाबांचे गुरू होते. काही लोक या पंथाला गुरु गोरखनाथच्या आधीपासून प्रचलित आहे असे सांगतात आणि याचा संबंध शैव मताच्या पाशुपत किंवा कालामुख संप्रदायाशी जोडतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती