येवला – गोमांस असलेले पिकअप वाहन नागरिकांनी पेटवून दिले; वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात

शनिवार, 9 एप्रिल 2022 (07:43 IST)
येथील फत्तेबुरुज नाका येथे गोमांस असलेले पिकअप वाहन अज्ञात नागरिकांनी पेटवून दिल्याची घटना घडली. घटनेची माहिती कळताच पोलिस आणि अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने त्वरित आग विझवली. दरम्यान, पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील फत्तेबुरुज नाका येथे मनमाड कडून कोपरगाव कडे जात असलेल्या पिकआप वाहनाचे मागील टायरचे अक्सेल तुटले. त्यामुले चालकाने गाडी थांबवली. या थांबलेल्या गाडीतून उग्र वास येत असल्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यानंतर वाहनात गोमांस असल्याचे लक्षात आल्यानंतर येथे लोकांची गर्दी वाढली. ही गर्दी बघून पिकअप चालक पसार झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी गोमांसने भरलेले वाहन पेटवून दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती