दुर्दैवी, 2 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेची आत्महत्या

शनिवार, 9 एप्रिल 2022 (07:38 IST)
सासरच्या मंडळींकडून पैशासाठी मानसिक छळ झाल्याने एका विवाहितेने आत्महत्या केली आहे.अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं… किराणा दुकान टाकण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी अवघ्या दोन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला.
त्यामुळे नवविवाहितेने शेततळ्यात आत्महत्या केल्याची घटना देवठाण येथे घडली आहे. याप्रकरणी पती, सासरा, सासू, दिर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चार जणांना अटक कऱण्यात आली आहे.
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशा योगेश गायकवाड (21) या तरुणीचा देवठाण शिवारातील शेततळ्यातील पाण्यात मृतदेह आढळून आला होता. तिचे वडील प्रभाकर त्रिभुवन (रा. चोरवाघलगाव, ता. वैजापूर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार निशाचा विवाह 22 फेब्रुवारीला देवठाण शिवारात राहणाऱ्या योगेश गायकवाड याच्यासोबत झाला होता.
 
एक महिन्यातच निशाला माहेरून किराणा दुकानासाठी एक लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू करण्यात आला होता. तिला सतत मारहाण, शिविगाळ करून त्रास दिला जात होता असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळेच निशाने आत्महत्या केली असावी असा आरोप करण्यात आला. येवला तालुका पोलिसांनी पती योगेश गायकवाड, सासरे परसराम गायकवाड, सासू भामाबाई गायकवाड, जेठ वाल्मीक गायकवाड, जेठानी पंचशिला गायकवाड आदी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांची (9 एप्रिलपर्यत) पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती