कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीतील शाळेतील शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आर्यन बुडकर असं या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मयत आर्यनने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थापक, चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने नंतर ते पसार झाले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी संतप्त होऊन शाळेत मोठा गदारोळ झाला असून ग्रामस्थांनी दगडफेक केली. आरोपी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी घेऊन मोर्चा काढण्यात आला आहे. गावात तणावाचे वातावरण असून कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.