खांद्यावर शस्त्रक्रियेसाठी अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

सोमवार, 4 एप्रिल 2022 (16:06 IST)
मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियेसाठी शनिवारी जे जे  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते.
 
बेकायदेशीर वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना 100 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर वसुलीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
 
सीबीआयने 21 एप्रिल 2021 रोजी देशमुखविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने यापूर्वी देशमुख यांना क्लीन चिट दिली होती, परंतु नंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एफआयआर नोंदवला. हे प्रकरण आयपीएस परमबीर सिंग यांच्या खुलाशाशी संबंधित आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना सिंग यांनी देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती