पैशाचा आमिषाने काढली किडनी, पैसेच दिले नाही, महिलेची पुण्यात फसवणूक

बुधवार, 6 एप्रिल 2022 (16:58 IST)
पुण्यात किडनी तस्करीचा गोरख धंदा सुरू असल्याची घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेला आमिष दाखवून तिची किडनी दलालमार्फत विक्री करण्यात आली होती. मात्र किडनी देऊन सुद्धा पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोरोगाव पार्क पोलिस स्टेशन तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुणे शहरात किडनी तस्करी करणारे रॅकेटचा बाजार उघडकीस आला आहे.
 
कोल्हापूरची मुळ निवासी असलेली सारिका गंगारामसुतार हिला दोन मुलं आहेत. त्यापैकी तिचा एक मुलगा हा मुका असून तो बोलू शकत नाही. तसेच सारिका ही अशिक्षित आहे.त्यातच पती वारल्यानंतर सारिकाची परीस्थिती बेताची झाल्याने ती कर्जाच्या डोंगराखाली दबली गेली होती. त्यामुळे स्वतःची कर्जातून सुटका कण्यासाठी सारिकाने तिच्या भोसले बाई या मैत्रिणीकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी भोसले बाईंनी सारिकाची भेट रवी भाऊ नामक व्यक्तीशी करून दिली. भोसले बाई आणि रवी भाऊने सारिका सुताराच अज्ञान आणि अशिक्षित पणाचा फायदा घेत तिला किडनी विकण्याच आमिष दाखवल. या आमिषाला बळी पडून सारिकाने आपली किडणी विकण्यास तयार दर्शवली.

सारिका आणि रवी भाऊ यांच्यात त्यासाठी १५ लाख रुपयांत व्यवहार ठरला. रवी भाऊने सारिका सुतारचे सुजाता साळुंखे नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून तिला अमीत साळुंखे नावाच्या व्यक्तीची पत्नी म्हणुन दाखवलं. तसेच अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची किडनी फेल झाली असल्याने त्याच्या पत्नी सारिका सुतारची किडनी द्यावी असे सांगण्यात आले. आणि ३१ मार्च २०२२ ला सारिका सुतारचा पंचतारांकि हॉस्पिलमध्ये ऑपरेशन करून तिची किडनी अमित साळुंखे रुग्णाला ट्रान्सप्लांट करून लावण्यात आली. मात्र किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करून सारिकाला एक रूपयाची दमडीही सुद्धा देण्यात आली नाही.
 
दरम्यान या घटनेनंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळताच, सारिकाने हा सर्व प्रकार आपल्या बहिण कविता कोळीला सांगितला. मात्र रवी भाऊ या दलालांच्या आमिषाला बळी न पडता कविता कोळी यांनी सामजिक कार्यकर्ते जितेंद्र हगड यांच्या मदतीने कोरेगाव पार्क पोलीस स्टेनमध्ये दलाला रवी भाऊ आणि पांचातारकीत हॉस्पीटल विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.तसेच किडनी तस्करी करुण विकणाऱ्या रॅकेटची राज्य सरकारने स्पेशल एसआयटी घटित करुण चौकशी करावी अशी मागणी पीडित महीला आणि तिच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेने पुण्यात किडनी तस्करीचा हॉस्पिलमध्ये सक्रिया असलेला एक मोठा रॅकेट उघडकीस आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती