स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा राज्य निवडणूक आयोगानेजाहीर केल्या आहे.राज्य निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतील. याचा अर्थ असा की सर्व मतदारसंघांमध्ये एकाच वेळी निवडणुका होणार नाहीत, तर वेगवेगळ्या टप्प्यात होतील. याशिवाय, या निवडणुकांमध्ये VVPAT (मतदान यंत्र संलग्न स्लिप पडताळणी प्रणाली) वापरली जाणार नाही.
मतदाराने टाकलेले मतदान मशीनद्वारे नोंदवले जाईल, परंतु त्याची पावती दिली जाणार नाही. यामागे तांत्रिक आणि प्रशासकीय सोयीचे कारण आयोगाने दिले आहे. या निवडणुका कधी सुरू होणार आहेत हे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नाशिक विभागात आज आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्व निवडणुका एकत्रितपणे घेतल्यास मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण होईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, कोणत्या संस्थेने प्रथम निवडणुका घ्यायच्या हे अद्याप निश्चित झालेले नाही.वाघमारे यांनी स्पष्ट केले की निवडणुकीत व्हीव्ही-पॅट मशीन वापरल्या जाणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.