नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाने आता आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे राज्यात 27% आरक्षणासह निवडणुका होणार आहेत.आता राज्य सरकारला 4 आठवड्यांच्या आत निवडणूक आयोगामार्फत अधिसूचना जारी करावी लागेल .निवडणूक प्रक्रिया 4 महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागेल.हा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 227 वॉर्डांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असेल.