अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे परिणामी पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची (Rain in maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.