यामुळे राज्यातील सर्व एसटी कर्मचारी प्रचंड तणावा खाली आहेत. बसचालक संतोष शिंदे हेसुद्धा मागच्या चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. याच तणावामुळे काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांच्या माघारी दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. असे अनेक किती संतोष जाण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे, असा सवाल जनतेकडून विचारण्यात येत आहे.
एसटी महामंडळ तत्काळ शासनात विलीन करावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. कालच संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्या कारणावरुन सातारा आगारात कर्मचाऱ्यांच्या दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादामध्ये डोक्याला दगड लागल्याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे हे जखमी झाले होते.