माहितीप्रमाणे औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड रुग्णालयात बोगस रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बोगस रुग्ण तसेच बाधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. तरुणांच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांचाही गोंधळ उडाला. त्यांनी कोविड सेंटरमधून सुटका करण्याची मागणी केली. नंतर रुग्णालय प्रशासनाच्याही हा प्रकार लक्षात आला. या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.