राज्यात पुन्हा मास्क अनिवार्य होणार ? कोरोनाची लाट येण्याची शक्यता !

बुधवार, 27 एप्रिल 2022 (11:17 IST)
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे कोरोनाचे लावण्यात आलेले सर्व प्रतिबंध काढण्यात आले. सर्व धार्मिक स्थळ कार्यालये, पूर्ववत व्यवहार सुरु झाले. दोन वर्षानंतर शाळा ,कॉलेज देखील सुरू करण्यात आले.  पण आता देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं काढायला सुरु केले आहे. पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे समोर आले आहे. सध्या कोरोनाचे प्रकरण कमी झाल्यामुळे लोक मास्क चा वापर करत न्हवते. आता पुन्हा कोरोनाची प्रकरणे  आढळून आल्यामुळे राज्यात पुन्हा मास्कची सक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य टास्कफोर्स ने मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आग्रह करण्यात आला आहे. येत्या जून मध्ये कोरोनाची सौम्य लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
अन्य राज्यात कोरोनाचे वाढते प्रकरण पाहून राज्य टास्कफोर्सची बैठक सोमवारी झाली. 
कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेत मास्कचा वापर अनिवार्य करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे, रुग्णांना शोधून जीनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे, सार्वजनिक परिसरात मास्कचा वापर बंधनकारक करणे आणि कोरोनासाठी आवश्यक अशा काही उपाययोजना करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्द्भव ठाकरे यांना देण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती