सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत - उद्धव ठाकरे

Webdunia
मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (08:13 IST)
नागपूर: सर्वोच्च न्यायालयात  कलम ३७० च्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकाने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटले आहे.
 
यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सप्टेंबरपर्यंत तिथे निवडणुका व्हाव्यात, जेणेकरून तिथले लोक मोकळा श्वास घेतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिली आहे. तसेच काश्मिरी पंडितांना मतदान करता येईल याची गॅरंटी मोदींनी द्यावी, असा खोचक टोला ठाकरेंनी या वेळी लगावला आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने २०१९ ला सुद्धा जेव्हा ३७० कलम हटावचा निर्णय घेतला होता तेव्हा आम्ही आमच्या पक्षाकडून त्याला पाठिंबा दिला होता. जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला याचं आम्ही स्वागत करतो.

संबंधित माहिती

पुढील लेख