नाशिक : शिवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा रविवारपासून ( दि.10 ) जिल्ह्यात येत असून उपनेत्या सुषमा अंधारे यांची तोफ मनमाड आणि नाशिक येथे घडाडणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली .
राज्यातील सध्याची राजकीय स्थिती,राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये असलेला समन्वयाचा अभाव,शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक, नवाब मलिकांवरून सध्या उफाळलेला वाद,अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान,आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी या पार्श्वभूमीवर त्या काय बोलतात आणि कुणावर असूड ओढतात त्याबाबत सर्वांचे उत्सुकता ताणली गेली आहे.
बैठकीस सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे,डी.जी.सूर्यवशी,उध्दव कदम,उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी,युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाठ,राहुल ताजनपुरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेस सुर्यवंशी,विकास गिते,महिला आघाडी महानगर समन्वयक प्रेमलता जुन्नरे आणि महानगराती शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.