मिळालेल्या माहितीनुसार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी फडणवीस सरकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आहे. या अनुषंगाने पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार आहे.
तसेच माहिती समोर आली आहे की, आज विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
हे अधिवेशन कमीतकमी वीस दिवसांपर्यंत चालणार असून या वर्षी पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करणे, शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर महायुती सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.