सकाळी सर्वप्रथम ते राजर्षी शाहू समाधीस्थळी जातील. यानंतर बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासह संविधान सन्मान परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. या सभेत एक हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार असून, सर्वधर्मीय लोकांसह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही यात सहभागी होणार आहेत.
हरियाणानंतर आता राहुल गांधींनी मिशन महाराष्ट्राची तयारी सुरू केली आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचीही सुरुवात होईल, असे मानले जात आहे.