राज्यात सुमारे 18 जिल्ह्यात 82 तालुक्यात तब्बल 1 हजार 165 ग्राम पंचायतीची निवडणूक होणार असून मतदान केले जात आहे. राज्यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, पुणे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात ग्राम पंचायतीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजे पासून संध्याकाळी 5 वाजे पर्यंत मतदान होणार असून नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजे पर्यंत मतदान होणार असून ग्राम पंचायतीसाठीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.