मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात हा अपघात झाला. थार कारने दोघांना धडक दिली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटना घडवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. फॉरेन्सिक टीम संपूर्ण गाडीची तपासणी करत आहे. जखमी व्यक्ती सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नाही, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.