नितेश राणे यांचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र

शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (20:57 IST)
भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे याची आठवण नितेश राणे यांनी आयुक्तांना करुन दिली आहे. नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दुर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे असंही ते म्हणाले आहेत.
 
पत्रात काय लिहिलं आहे –
“सातत्याने मुंबई महानगरपालिका ही आदित्य सेना टक्केवारी गँगमुळे भष्ट्राचारासाठीच चर्चेत राहिली आहे. म्हणूनच प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची ही भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे. पण मुंबई उच्च न्यायलायाने घाटकोपर येथील पश्चिम किरोळ गावातील एका इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत जलवाहिनीची सुविधा नसताना महापालिकेने अंशत: भोगवटा प्रमाणपत्र (पार्ट ओसी) दिले. यावर महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
 
“महापालिकेचे प्रशासक म्हणून आपले अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मुभा देतात. नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दुर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती