सांगली :अधिकाऱ्याने लाच मागितल्यावर अंगावरचे कपडे काढून दिले

शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (17:00 IST)
खरं तर लाच घेणं आणि लाच देणं हे दोन्ही गुन्हा आहे. तरीही काही लहान मोठ्या ऑफिसात प्रत्येक लहान मोठे काम करून घेण्यासाठी लाच दिली आणि घेतली जाते. लाच देत नाही म्हणून काम देखील करायला या ऑफिसातील लोक अडवतात. काहींना बळजबरी लाच द्यावीच लागलेत. लाच घेण्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आरटीओच्या कार्यालयात घडला असून लाच देण्याऐवजी त्या माणसाने जे काही केले त्याची चर्चा सर्वत्र होत असून अधिकाऱ्याला चांगलाच धडा मिळाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ,सदर घटना सांगलीतील कडेगाव तालुक्यातील एका आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील आहे. येथे भ्रष्टचारच्या विळख्यात अडकलेल्या एका भ्रष्ट अधिकाऱ्याने गाडीच्या पासिंगसाठी शेतकरी तरुणाकडे10 हजार रुपयांची लाच मागितली.या शेतकरी तरुणाकडे  खायला पैसे नाही तो दहा हजार कुठून आणि कसे देणार हा प्रश्न त्याच्या पुढे होता. त्याने आपल्या अंगावरील कपडे त्या लाचखोर अधिकाऱ्याला देत म्हणाला ,साहेब तुम्ही हे कपडे घ्या पण माझे काम करून द्या. 

एकाएकी घडलेला सर्व प्रकार पाहून सर्वच चकित झाले. त्या अधिकाऱ्याला देखील हा काय प्रकार सुरु आहे. समजेना .या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून  प्रमोद मांडवे या  सामाजिक कार्यकर्तेने लाच मागितल्यावर त्यांनी आपले कपडे काढून देत अशा प्रकारचे आंदोलन केले. घडलेल्या प्रकारानंतर लाच मागणाऱ्या  या भ्रष्ट अधिकाऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला .आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती