वर्ल्डकप आता मराठीतून?

शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (15:03 IST)
टी20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या सामन्यांवर मराठी भाषेतही प्रतिक्रिया नोंदवल्या  जातील.विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यापूर्वी कोणताही विश्वचषक तुम्ही मराठीत प्रक्षेपित झालेला पाहिला नसेल.
 
यंदाच्या विश्वचषकात भारताचे सामने मराठीसाठीही खास असणार आहेत. कारण मराठी भाषेला दिल्या जाणार्‍या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण टेलिकॉम सेनेने याबाबत मोठे आंदोलन केले होते. आता मनेसेने आंदोलनाचा इशारा दिला असून स्टार स्पोर्ट्सला आपल्या भाषेत धडा शिकवण्याचा इशाराही दिला आहे. ज्यानंतर आता स्टार स्पोर्ट्स चॅनेलचे अधिकारी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

Edited by : Smita Joshi
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती