प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला धक्का, एकही पंचायत समितीत सभापती नाही

रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (10:44 IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची पाटी कोरी राहिली असून फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावे लागले आहे.
 
जिल्ह्यातील 13 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहे. तर तीन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला आहे. तर एका तालुक्यात शिंदे गटाचा सभापती झाला आहे. 'पुढारी'ने ही बातमी दिली आहे.
 
कॉंग्रेसला सभापतीपद मिळालेल्या पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही, भिवापूर या पंचायत समितींचा सामवेश आहे.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेली पंचायत समित्यांमध्ये नरखेड, काटोल व हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले आहे. यासोबतच रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे.
 
Published By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती