दर तीन वर्षातून येणार अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास हा वारकरी संप्रदायाची पर्वणी काळ असतो. त्यासाठी लाखो भाविकांनी पंढपुरात गर्दी केली आहे. तर अधिक महिना सुरु झाल्यापासून शहरात रोज दोन लाखापेक्षा जास्त भाविक येत आहेत. यातच शनिवार आणि रविवार या जोडून सुट्ट्या आल्यावर हा आकडा तीन ते चार लाखापर्यंत जात आहे.
पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढपुरात दाखल झाले आहेत. तसेच पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. दर तीन वर्षाने येणाऱ्या या पुरुषोत्तम मासाचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. दरम्यान शनिवार रोजी या महिन्याचा पर्वणी काळ आहे.
या अधिक मासातील या एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी झेंडू, मोगरा, कामिनी, ब्ल्यू डीजे, टटिस, शेवंती, गुलछडी, गुलाब अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा वगळून चौखांबी, सोळखांबी, विठ्ठल आणि रुक्मिणी सभामंडप येथे ही सजावट करण्यात आली आहे . या सुगंधी फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सुगंधाने बहरुन गेले आहे.