कळवणच्या मानूर शिवारात हा पेट्रोल पंप आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोल न मिळाल्याने हा हल्ल्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या हल्लामागे प्राथमिक कारण समोर आले असले तरी त्यामागे इतर काही उद्देश आहे का? याचा शोध पोलिस घेत आहे. पेट्रोल – डिझले भरण्यासाठी आलेले हे चारही जण मद्याच्या नशेत होते का ? याचाही तपास घेतला जात आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसणा-यांची ओळख पटली असून ते नियमीत पेट्रोल पंपावर येत असल्याचे येथील कामगारांनी सांगितले.
पवार हे कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पंप आणि कार्यालयावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, नितीन पवार यांचे वडिल दिवंगत ए टी पवार हे तब्बल सलग सातवेळा आमदार राहिले आहेत. पवार कुटुंबाचे मूळ गाव हे कळवण हेच आहे. असे असताना त्यांचे वर्चस्व असलेल्या भागात काही जणांनी हल्ला केला आहे.