दुर्देवी ! सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (13:30 IST)
औरंगाबाद मध्ये रोहित्रावरील विद्युत तार तुटला आणि विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली.गेवराई ब्रूकबॉन्ड हे शहरापासून काहीच अंतरावर आहे.येथे पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे.या मधून विद्युत तार तुटून पडली आणि तेथेच मोकळ्या जागेत चारत असलेल्या गाईंपैकी 7 गायीचा विजेचा धक्का लागून दुर्देवी अंत झाला.या घटने मुळे शेतकऱ्यांनी इतर गायींना हाक मारून बाजूला केल्याने मोठा संकट टळला.
 
या घटने ची माहिती मिळतातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विद्युत पुरवठा बंद केला.पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्युमुखी झालेल्या गायींचा पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती