MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (11:33 IST)
अखेर सरकारनं राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आज जाहीर केली.पूर्वी MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता पुढे ढकलण्यात आल्या होत्या.आता या परीक्षेची तारीख जाहीर केली असून ही परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.806 जागांसाठी PSI/STI/ASO पदासाठी ही परीक्षा घेतली जाणार.या पूर्वी ही परीक्षा 6 वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
 
या परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग चांगलाच संतापला होता.आणि त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होते.आता राज्य व केंद्र शासनाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षेच्या तारख्या आयोगा कडून जाहीर करण्यात आल्या आहेत.या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल चार लाख परीक्षार्थी बसणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती