पिसोरा या वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणी ठोसेघर , सातारा येथील दोघे जण वनविभागाच्या जाळयात अडकले असुन त्यांच्या राहत्या घरातून पातेल्यात शिजवलेले मांस जप्त करण्यात आले असुन आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे
मिळालेल्या माहीतीनुसार सातारा तालुका वनविभागाचे वन क्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने मध्यरात्री ठोसेघर येथील आरोपी बाबुराव रामचंद्र जाधव व रघुनाथ विठ्ठल चव्हाण यांच्या राहत्या घरी भेट देऊन तपास केला असता जर्मनच्या पातेल्यात पिसोरा वन्यप्राण्याचे मांस शिजवल्याचे आढळुन आले व वनक्षेत्रात जाऊन शिकार केल्याची त्यांनी कबुलीही दिली असुन त्यांना वन्यजीव व वनआधिनियम या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे