गृह मंत्रालय काही तासातच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

गुरूवार, 21 एप्रिल 2022 (21:29 IST)
गृह मंत्रालयाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढल्यानंतर काही तासातच नवा आदेश काढला आहे. बदली आणि पदोन्नतीच्या या आदेशामधील ५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही स्थगिती का आणि कुणाच्या सांगण्यावरुन दिली याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
राज्याच्या गृहविभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले. त्यात नाशिक पोलिस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे, पिंपरी चिंचवड आयुक्तपदी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुंबई आणि ठाण्यातील ५ अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यात पोलिस अधिकारी पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे, संजय जाधव, महेश पाटील, राजेंद्र माने या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पाचही अधिकाऱ्यांना अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. मात्र, या बढती आदेशाला अचानक स्थगिती का देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती