मिळालेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान बदलत आहे. कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादकांसाठी समस्या निर्माण झाल्या आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे समुद्रातील बोटींनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बोटी समुद्रातून परत आल्या आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान बदलत आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
कर्नाटक समुद्राकडे सरकणाऱ्या चक्रीवादळामुळे, २९ ते ३० मार्च दरम्यान कोकण किनाऱ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी त्यांच्या बोटी किनाऱ्यावर उभ्या केल्या आहे.