मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या छाप्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तसेच या बेकायदेशीर कारभाराची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. शुद्ध दुधाऐवजी दुधाची पावडर, रसायने आणि इतर भेसळयुक्त पदार्थांपासून बनावट पनीर बनवण्यात येत होते. पथकाने कारखान्यातून वस्तू जप्त केल्या. जप्त केलेले पनीरचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून निकालांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. अशी माहिती समोर आली आहे.