तसेच हवामान विभागानुसार, कोकणात प्रचंड तापमान वाढत असून उष्ण हवामानाचा यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढणारअसून काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मंगळवार आणि बुधवारी तापमानात आणखी वाढ होऊ शकते. तापमान वाढण्याचे कारण पूर्वेकडून येणारे उष्ण वारे आहे. तसेच गुरुवारपासून मुंबईचे तापमान थोडे कमी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी मार्चपासूनच उष्णता सुरू झाली आहे. एप्रिलमध्येच तापमान इतके वाढले आहे की जणू काही मे आणि जून आहे. जोरदार उष्ण वारे उष्णतेच्या लाटेत रूपांतरित झाले आहे.