मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या विरोधात एका संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहे आणि बिगर-मराठी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.