मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करातात.दररोज लोकलला प्रचंड गर्दी असते. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणाऱ्या गर्दीच्या लोकल मधून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यावर मुलीच्या बॉयफ्रेंडनेच तिचे अपहरण केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
घरात गेल्यावर त्यांना बेपत्ता झालेली मुलगी सापडली. पोलिसांनी तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि मुलाला अटक केली. मुलीने पोलिसांना सांगितले की, मुलाने तिला फसवून इथे आणले तर मुलाने ही स्वतः माझ्यासोबत आल्याचे म्हटले. पोलिसांनी त्यांच्या मित्रांची चौकशी केली असता त्यांनी मुलं-मुलीचे आपसांत प्रेम संबंध असल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देऊन मुलाला अटक केली असून पुढील तपास करत आहे.