Satara : ॲड प्रकाश आंबेडकरांची इंडिया आघाडी सोबत जाण्याची घोषणा

रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (13:02 IST)
साताऱ्यात गांधी मैदानात संविधान जनजागृती विचारमंचाच्या वतीने संविधान बचाव अभियानांतर्गत एका सभेचे आयोजन करण्यात आले.वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सभेत बोलताना इंडिया आघाडी सोबत जाण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, देशातील वातावरण निर्भय बनवायचे असेल तर विचारपूर्वक मतदान दिल्याने येत्या निवडणुकीत मोदींचा पराभव अटळ असणार. सध्या देशात संस्कृती, इतिहास उध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. जुन्या आणि नव्या इतिहासाच्या मुद्द्यावरून सर्वसामान्याला भरकटवले जात आहे. सत्तेसाठी सर्व यंत्रणांचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे.    

भाजपचे पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. या साठी आमचा पक्ष वंचित आघाडी इंडियासोबत जाण्यास तयार आहे. सध्या देशात गोडसे, गोळवलकर विरुद्ध फुले, हेडगेवार, शाहू, गांधी, आंबेडकर यांच्या विचार प्रवाहाची लढा सुरु आहे. 

प्रकाश आंबेडकर साताऱ्यातील गांधी मैदानावर संविधान जनजागृती विचारमंचच्या वतीने संविधांन बचाव अभियानांतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ॲड. अविनाश धायगुडे, अभिनेते किरण माने, सादिक शेख, अल्ताफ शिकलगार, जुनेद शेख, सादिक बागवान, सिद्धार्थ खरात, गणेश भिसे, बाळकृष्ण देसाई आदी उपस्थित होते. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती