देशाला दिशा देण्यासाठी इंडिया आघाडी तयार आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. मात्र आम्ही सगळे एकत्र येऊन नवा पर्याय देऊ असे आश्वासन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले. आज ते कोल्हापुरात बोलत होते. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील पण ते इंडिया सोबत आले तर त्यांचा आघाडीला फायदा होईल असेही ते म्हणाले. आमच्याकडे निवडून येणाऱ्याला उमेदवारी देणार आहोत.इंडिया आघाडी नागरिकांना देखील आवडत असल्याचे सांगतानाच यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आमच्या नव्या आघाडीचा धसका भाजपने घेतला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात भाजपने किती तोडफोड केली आहे पहा. घोषणा झाल्या पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठं आहे.सगळ्यात जास्त निधीच्या घोषणा या सरकारने केल्या.पण ग्राऊंडवर मात्र नागरिकांना काही मिळताना दिसत नाही.तोडफोड करून उमेदवार देतात आणि घराणेशाही नाही असं म्हणतात, असा टोलाही लगावला.
मागच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री होते, मी देखील मंत्रिमंडळात होतो.मराठा आरक्षणाबाबत आता मुंबईत बैठक घेऊन उपयोग नाही.दादांना देखील कायदा कळतो, केंद्राने आता निर्णय घ्यायला पाहिजे.