औरंगाजेबाला शिव्या कशाला घालता, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

शनिवार, 17 जून 2023 (21:47 IST)
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आले आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगाजेबाला शिव्या कशाला घालता,” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
 
या भेटीनंतर शिवसेनेची कोंडी होऊ शकते? या प्रश्नावर मोजक्या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. “या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
 
औरंगाजेबाच्या स्टेटसमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. याबद्दल विचारल्यावर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर, दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय म्हणजे, होऊ देता म्हणून,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती