दिनांक 20 सप्टेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद होते. केंद्र सरकारने लागू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे ही व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह अजून काही मागण्या असल्या तरी जरी प्रत्यक्षात निर्यात शुल्काची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लिलाव प्रक्रियेमध्ये भाग न घेण्याचा निर्णय नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला होता.
त्याप्रमाणे आज गुरुवारपासून त्यांनी या ठिकाणी लिलाव सुरू केले. या ठिकाणी कांद्याला प्रतिक्विंटल 2100 रुपये भाव मिळाला आहे. मात्र उर्वरित सोळा बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी आपला बंद हा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता सध्या सुट्टी असल्यामुळे लिलाव प्रक्रिया बंद आहे. मात्र ही प्रक्रिया 3 ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर इतर बाजार समिती व्यापारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीत बैठक
दरम्यान कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा पियुष गोयल यांनी व्यापाऱ्यांना दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून 29 सप्टेंबर रोजी कांदा व्यापारी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बैठक होणार आहे. यामध्ये राज्य सरकारचे एक प्रतिनिधी मंडळ देखील उपस्थित राहणार आहे तसेच केंद्रातील अधिकारी आणि काही मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.