नाशिकरोड: वालदेवी नदी पात्रत दोन महाविद्यालयीन युवकासह एका विवाहित तरुणाचा बडून मृत्यु
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (08:09 IST)
नाशिकरोड येथे गणपती विसर्जनाला गालबोट लागले. वालदेवी नदी पत्रात तीन जणांचा बुडून मृत्यु झाला असून त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे.
नाशिकरोड सिन्नर फाटा चेहडी शिव येथील empire marvel या इमराती मधील सर्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन साठी प्रसाद सुनील दराडे (वय 18) हा आपला मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे (वय 22, रा. हरी संस्कृती, खर्जूल मळा, नाशिकरोड) चेहडी येथील संगमेशर येथे गेले होते. मागील काही दिवसापासून मूकबल पाऊस असल्याने नदी पात्र ओसंडून वाहत होते.
यावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पोहता येत नसल्याने पाण्यात तो बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण डुबून वाहून गेले. नदी पत्राचे वाकडेतीकडे वळण, मोठे दगड यांचा मार लागून दोघे जखमी झाले. पाण्यात वाहत येत असल्याचे पाहून बंदोबस्त साठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रामदास विंचू यांनी सहकारी व नागरिकांच्या मदतीने एक एकना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले.
रुग्णवाहिका नसल्याने पोलीस वाहनातुन त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रोहित नागरगोजे यास जिल्हा रुग्णालयात तर प्रसाद दराडे यास बिटको व नंतर सिन्नर फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याना तपासून मयत घोषित केले.
प्रसाद हा जे डी सी बिटको महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो इ 12 मध्ये शिकत होता तर रोहित हा सामनगाव येथील इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेते होता. दोघे ही मित्र होते आणि अभ्यासात हुशार आणि मितभाषी होते.
दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर येथे घडली आहे. दुपारी भविक वडनेर येथे वालदेवी नदी घाटावर गणपती विसर्जन करीत असतांना महादेव मंदिर, लहान पुला जवळ हेमंत कैलास सातपुते (वय 35) हा विवाहित तरुण वालदेवी नदी पत्रात बुडाला. माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांनी अग्निशमक दलाला माहिती दिली असता जवानांनी नदी पत्रात त्याचा शोध घेत आहे.
पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने व रात्र झाल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन महाविद्यालय तर एक विवाहित तरुणचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.