सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' हा अजूनही चर्चेत आहे. या शोबद्दल दररोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. यावेळी 'बिग बॉस'चे घर संसदेपासून प्रेरित असलेल्या थीमवर डिझाइन केले आहे, ज्याचे नाव 'घरवालों की सरकार' आहे. चाहते बिग बॉसचे घर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
आज तकच्या वृत्तानुसार, बिग बॉसचे घर काल मीडियासाठी उघडण्यात येणार होते पण ते होऊ शकले नाही. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे, त्यामुळे जिओ हॉटस्टार टीमने हा कार्यक्रम रद्द केला.
बातमीनुसार, टीमने सांगितले की, शहरात मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे, 'बिग बॉस हाऊस टूर' आणि उर्वरित शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. पावसाच्या परिस्थितीनुसार आम्ही तुम्हाला अधिक माहिती देऊ.