Talathi Bharti Result 2023 Merit List : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

Webdunia
रविवार, 7 जानेवारी 2024 (13:49 IST)
राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या भरती परीक्षेतील उमेदवारांची जिल्हा गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यानुसार निवड प्रक्रिया लवकरच होणार आहे. पेसा कायद्यानुसार, राज्यातील  13 जिल्ह्यातील निवड प्रक्रिया बाबत याचिका दाखल आहे त्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासनेच्या मान्यतेनंतर उर्वरित यादी जाहीर करण्यात येणार आहे. हे यादी जाहीर करण्याचे काम नियमानुसार सुरु होणार आहे. 

गेल्यावर्षी राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने तब्बल 4,644 तलाठी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, खुलल्या गटात 1000 रुपये तर इतर गटांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क होते. 11 लाख 50 हजार 265 अर्ज आले आहे. 10 लाख उमेदवारांनी शुल्क भरले असून ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांनाच परीक्षेसाठी पात्र धरले जाईल .असे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट केले आहे. 

तलाठी पदाच्या परीक्षेची गुणवत्तेची यादी जाहीर केली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार, सुरु केले आहे.  
 
Edited By- Priya Dixit  

संबंधित माहिती

पुढील लेख