तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात; लाचखोर तलाठी संघटना अध्यक्ष

बुधवार, 14 जून 2023 (07:54 IST)
जत :जत तालुक्यातील वादग्रस्त करजगी येथील तलाठी, जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष बाळासाहेब शंकर जगताप यास ५० हजाराची लाच घेताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी तालुक्यातील आसंगी येथे राहत्या घरी रंगेहाथ पकडले. या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
 
तलाठी बाळासाहेब जगताप हा करजगी येथे तलाठी पदी कार्यरत आहे. तक्रारदार यांचे घराचे बांधकाम सुरू असून बांधकामाकरीता आलेली वाळूचा बेकायदा वाळू साठा केली आहे असे सांगून बेकायदा वाळुची साठवणुक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी तलाठी जगताप याने तक्रारदारकडे ५० हजार लाचेची मागणी केली होती. तक्रारदार याने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे घराचे बांधकाम सुरू असून बांधकामा करीता आणलेली वाळू ही बेकायदा वाळू साठा केला आहे. असे सांगून वाळुची बेकायदा साठवणुक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी तलाठी जगताप, याने ५० हजार लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
 
ही कारवाई पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, अप्पर उपआयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार, विनायक मिलारे, प्रित्तम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सिमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली.
घरात लावला सापळा
 
पथकाने मंगळवारी तलाठी जगताप यांचे गुडडापूर रोडवरील आसंगी येथे राहत्या घराचे ठिकाणी सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून राहत्या घरी ५० हजाराची लाच स्विकारताना तलाठी जगताप यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात लाचखोर तलाठी बाळासाहेब जगताप याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरा सुरू होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती