कोल्हापूर तळवडे (आंबा) येथील रिसॉर्टमध्ये मणीपूर राज्यातील युवतीची आत्महत्या

सोमवार, 12 जून 2023 (07:35 IST)
शाहुवाडी तळवडे (आंबा )तालुका शाहुवाडी येथील रिव्हर साइड कांऊन्टी रिसॉर्ट येथे सोपेमी कौंसिग वय 19 रा सांग्रे टिंगशा लेशीरीम चमू जि उखरुल मणीपूर   या युवतीने आत्महत्या केल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाले आहे .
 
मिळालेल्या माहितीनुसार सदर युवतीचा भाऊ  या रिसॉर्ट मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे . रिसॉर्टच्या राहत्या घराच्या पाठीमागील खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास लावून युवतीने आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही .  याबाबतची फिर्याद सुनिल विलास काटे यांनी दिली आहे . या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल पावरा हे करत आहेत .
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती