मिळालेल्या माहितीनुसार, टपाल विभागाने एक नवीन सॉफ्टवेअर लाँच केले आहे ज्यामुळे काही तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सध्या टपाल कार्यालयाच्या नियमित सेवा विस्कळीत आहेत. शुक्रवार आणि शनिवारी सेवा पूर्णपणे बंद असताना, सोमवारी सकाळी 8 ते10 वाजेपर्यंतच नवीन सॉफ्टवेअरवर काम करता आले. त्यानंतर, सेवा पुन्हा बंद करण्यात आली.