कृती-
सर्वात आधी एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात खवलेला नारळ किस, साखर आणि दूध मिक्स करा. जर तूप वापरत असाल तर तेही मिसळा. भांडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि दोन मिनिटे हाय पॉवरवर गरम करा. दर एक मिनिटाला काढून ढवळा. मिश्रण घट्ट होईपर्यंत दोन मिनिटे अंतराने गरम करा मिश्रण चिकट आणि एकजीव झाले की तयार आहे. आता वेलची पावडर घाला आणि नीट ढवळा. एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण पसरवा. वर काजू/बदाम पेरा गार्निश करा आणि दहा मिनिटे थंड होऊ द्या. आता मिश्रण सेट झाल्यावर चौरस किंवा इच्छित आकारात कापा. तर चला तयार आहे आपली रक्षाबंधन विशेष नारळ बर्फी रेसिपी.
टीप: मायक्रोवेव्हऐवजी फ्रीज वापरूनही बर्फी सेट करू शकता, पण त्याला जास्त वेळ लागेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.