कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये नारळ किस, सफरचंद किस आणि साखर मंद आचेवर परतून घ्या.आता ते चांगले भाजल्यावर त्यात वेलची पूड आणि अक्रोड घाला आणि परतून घ्या. आता मिश्रण मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता एका प्लेटला तूप लावून घ्यावे व प्लेटमध्ये काढा आणि थोडे थंड होऊ द्या. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यावर पिस्ता घाला, हातांनी हलक्या हाताने दाबा आणि चाकूने बर्फीच्या आकारात कापून घ्या. तसेच सेट होण्यासाठी साधारण तीन तास ठेवा. तर चला तयार आहे आपली रामनवमी विशेष सफरचंद नारळाची बर्फी रेसिपी .