साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे, त्यानुसार सातारा जिल्ह्यातील वाई येथील न्यायालयात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार गॅंगवार मधून झाला असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव याच्यासह त्याचे साथिदार निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहीतीमध्ये कळाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याचे साथिदार वाई न्यायालयात तारखेसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा गोळीबार झाला. यामध्ये दोन राऊंड फायर झाले आहे. या गोळीबाराने कोणाला दुखापत झाली नसली तरी वाई शहर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेने परिसरात खळबळ माजली असून याची माहिती समजताच वाई पोलिसांची न्यायालयात धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला.