स्वराज्याच्या बोधचिन्हासाठी संभाजीराजेंचं जनतेला आवाहन

Webdunia
गुरूवार, 16 जून 2022 (08:41 IST)
संभाजीराजे छत्रपती  यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची  घोषणा केली होती. महाराष्ट्रातील विस्थापित मावळ्यांना संघटित करुन स्वराज्य आणण्यासाठी या संघटनेची स्थापना केली आहे. परंतु या संघटनेचे बोधचिन्ह काय असणार याबाबतची माहिती संभाजीराजे यांनी दिली नव्हती. आज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारण्यात यावे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समर्थकांना संघटनेसाठी कल्पक असे बोधचिन्ह पाठवण्यास सांगितले आहे.
 
माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह सर्वांच्या संकल्पनेतून साकारणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह ( लोगो ) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे अशी माझी इच्छा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

पुढील लेख