गेल्या सहा महिन्यांच्या काळात पीडित मुलीवर 400 पेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केले आहेत, ज्यात एका पोलिसाचाही समावेश असल्याची माहीती देण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी 20 आठवड्याची गर्भवती राहिल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पीडित मुलीची आई ती लहान असतानाच वारली. पीडित मुलगी सातवीपर्यंत शिकलेली असून वसती गृहात राहत असताना वडील तिला गावी घेऊन गेले. नंतर लगेच ती 13 वर्षांनी असताना बळजबरीने तिचं लग्न लावून दिलं. सासरी नवर्याने संभाळया नकार दिल्यामुळे ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले. पीडितेने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
तिने सांगितले की, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला. याबाबत ती तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलिस ठाण्यात अनेकवेळा गेले मात्र तेथून तिला हूसकावून लावण्यात आले. तिने घटना सांगितल्यावरही दोषींवर कारवाई केली गेली नाही. एवढेच नाही तर एका पोलिस कर्मचार्याने देखील माझ्यावर अत्याचार केला आहे.असे त्या पिडीत अल्पवयीन मुलीने जबाबात म्हटले आहे.