राज्यात एसटी पुन्हा धावण्यास काही प्रमाणात सुरुवात

शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (11:26 IST)
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेले तीन दिवस एसटीचा संप 100 टक्के सुरू होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर कालपासून कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर परतत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.
शुक्रवारी (12 नोव्हेंबर) एकूण 17 डेपोंमधून बस सोडण्यात आल्या. त्यांमधून 800 पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला, असं चन्ने यांनी सांगितलं.
 
काही ठिकाणी राज्यात एसटी तसंच खासगी बसवर दगडफेक करण्यात आली. त्या प्रकरणी राज्यभरात 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं चन्ने यांनी सांगितलं.
 
दरम्यान, आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचं दिसून आल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचं म्हटलं जात आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती